आज आम्ही तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलो आहोत. तुम्हाला फ्री Amazon Prime चे सब्सक्रिप्शन हवे आहे का? असं असेल तर ही बातमी संपूर्ण वाचा. भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये Jio, Airtel आणि Vodafone Idea हे सर्व प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहेत जे रिचार्जवर फ्री OTT सब्सक्रिप्शन देतात. ग्राहक दीर्घ वैधतेसाठी Amazon Prime लाईट सब्सक्रिप्शन देणारे प्लॅन निवडू शकतात.आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या मोफत OTT प्लॅनची माहिती देत आहोत. जाणून घेऊया कोणती कंपनी सर्वात स्वस्त मोफत Amazon Prime प्लॅन ऑफर करत आहे.
Jio चा फ्री Amazon Prime प्लॅन
रिलायन्सच्या Jio च्या फ्री Amazon Prime लाईट प्रीपेड प्लॅनची किंमत 1029 रुपये आहे आणि रिचार्ज केल्यास 84 दिवसांच्या वैधतेसह हा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी रोज 2GB डेटा मिळतो आणि युजर्सना रोज 100 SMS पाठवता येतात. तसेच युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळतो. यात जिओ टीव्ही आणि जिओ एआयक्लाऊडटा अॅक्सेस आहे.
Airtel चा मोफत Amazon Prime प्लॅन
Airtel युजर्सने 1199 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज केल्यास 84 दिवसांसाठी मोफत Amazon Prime लाईट बेनिफिट्स मिळतात. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची असून रोज 2.5 GB डेटा दिला जात आहे. युजर्स सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करू शकतात आणि रोज 100 SMS देखील पाठवू शकतात.तसेच, एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम अॅक्सेस उपलब्ध आहे, ज्यात 22 पेक्षा जास्त OTT सेवांचा कंटेंट पाहण्याचा पर्याय आहे. पात्र युजर्सना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ देखील दिला जात आहे आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स देखील उपलब्ध आहेत.
Vodafone Idea चा मोफत Amazon Prime प्लॅन
सर्वात स्वस्त मोफत Amazon Prime लाईट प्लॅन Vodafone Idea ऑफर केला जात आहे आणि त्याची किंमत 996 रुपये आहे. यात प्राईम लाईटचा फायदा 90 दिवसांसाठी मिळतो. 84 दिवसांची वैधता आणि रोज 100 SMS सह रोज 2GB डेटा मिळतो. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करता येते.विकेंड डेटा रोलओव्हर व्यतिरिक्त यात डेटा आनंदासह 2 GB बॅकअप डेटा मिळतो. तसेच रात्री 12 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटाचा अॅक्सेस देण्यात आला आहे.