तुम्ही Vodafone Idea च्या परवडणाऱ्या प्लॅनबद्दल माहिती शोधत आहात का? आज आम्ही तुम्हाला Vodafone Idea च्या एका नव्या रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन तुम्हाला रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. चला तर मग या Vodafone Idea च्या प्लॅनविषयी जाणून घेऊया.टेलिकॉम कंपन्यांमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते तेव्हा Vodafone Idea चे नाव कोठेही येत नाही. आता जिओ आणि एअरटेलपेक्षा BSNL ची जास्त चर्चा होत आहे. तर Vodafone Idea ने पुनरागमन करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. Vodafone Idea ने 340 रुपयांचा प्लॅन जाहीर केला आहे ज्यात युजर्संना खूप काही मिळत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये जिओ आणि एअरटेलने मोबाइल प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. यानंतर स्वस्त प्लॅनच्या पार्श्वभूमीवर लोक BSNL कडे वळले. BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 55 लाख नवे ग्राहकही अतिशय वेगाने जोडले आहेत. आता या नव्या प्लॅनमुळे Vodafone Idea पुनरागमन करू शकतो का, हे पाहावं लागेल.
340 रुपयांत काय मिळणार?
Vodafone Idea चा नवा 340 रुपयांचा प्लॅन खरेदी केल्यास तुम्हाला 28 दिवसांसाठी रोज 2GB इंटरनेट मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग देखील प्लॅनचा भाग असेल. तसेच रोज 100 फ्री SMS मिळतील. या प्लॅनमधून युजर्सला सर्वात मोठा फायदा होणार आहे की, जर तुम्ही दिवसभरात 2 GB डेटा वापरत असाल तर तुम्हाला रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही चार्जशिवाय 1 GB अतिरिक्त डेटा दिला जाईल. हा 1 GB डेटा या प्लॅनचा भाग असेल, ज्याचा वापर तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत करू शकाल. सकाळी 6 वाजल्यानंतर तुमचा रोज 2 GB डेटा सुरू होईल. या प्लॅनमध्ये युजर्संना रोज 3 GB डेटाचा फायदा मिळणार आहे.
BSNL काय देत आहे?
Vodafone Idea चा नवीन प्लॅन ज्यांना अधिक डेटाची आवश्यकता आहे त्यांना लक्षात घेऊन डिझाइन केली गेली आहे. जर तुम्हाला हा प्लॅन महाग वाटत असेल तर तुम्ही BSNL कडेही पाहू शकता. BSNL कमी किंमतीत अधिक वैधतेचे प्लॅन देत आहे. BSNL चे 99 रुपयांपासून ते 299 रुपयांपर्यंतचे प्लॅन परवडणारे आहेत. त्यांना अतिरिक्त डेटा मिळणार नाही परंतु त्यांना बरीच वैधता मिळेल. BSNL च्या 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये 17 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तर 139 रुपयांमध्ये 299 रुपयांत 28 दिवसांसाठी 1.5 GB डेटा आणि 28 दिवसांसाठी रोज 2 GB डेटासह कॉलिंग मिळणार आहे.